*ओबीसीसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार*

 *ओबीसीसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार*
नगर 
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अहमदनगरच्या दौऱ्यावर आहेत.आज सकाळी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी राज्यातील ओबीसींसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राज्य शासनामार्फत विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुल योजना राबवण्यात येतात. ज्यामध्ये अनुसूचित जातीसाठी रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, राज्यासह देशभरात सर्वपरिचित असलेली पंतप्रधान मोदी घरकुल योजना अशा विविध योजना विविध प्रवर्गातील नागरिकांसाठी शासनामार्फत राबवण्यात येतात. मात्र या योजनेसोबत ओबींसींसाठी देखील वेगळी योजना राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी फडणवीस म्हणाले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वच शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजनेला गती देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यासाठी 'गाळमुक्त धरण, गाळमुक्त तलाव' योजनेला प्राधान्य दिले पाहिजे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेत नगर जिल्ह्याचे उत्तम काम असल्याचे सांगत आगामी काळात ओबीसीसाठी वेगळी आवास योजना सुरु होणार असल्याचे ते म्हणाले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.