*महसूल विभागातील बदल्यांच्या प्रक्रियेला अखेर मुहूर्त*
नगर : मागील दाेन वर्षांपासून काेराेनाच्या संकटामुळे महसूल विभागातील बदल्यांना ब्रेक लागला हाेता. मात्र, आता या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. महसूल विभागातील १४३ कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी बदली पात्र कर्मचाऱ्यांकडून विकल्प भरून घेतले जात आहेत. ३१ मे अखेर बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे
काेराेनामुळे गेल्या दाेन वर्षांपासून बदल्यांची प्रक्रिया रखडली हाेती. मात्र, आता मे महिन्यापासून बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने विनंती बदल्या व प्रशासकीय बदल्या करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. २३ ते २६ मेपर्यंत कर्मचाऱ्यांकडून बदलीचा विकल्प भरून घेतला जाणार आहे.