महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्याचे पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.
बारावीचा निकाल उद्या *दुपारी 2* वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे ते 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी वेबसाईटवर अर्ज करता येईल. तसेच उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. विद्यार्थ्यांना 5 जून रोजी गुणपत्रिका महाविद्यालयात मिळणार आहे.
*कुठे पाहता येईल निकाल?*
▪️बारावीचे विद्यार्थी
1) www.mahahsscboard.in
2) mahresult.nic.in
3) hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर आपले निकाल पाहू शकतात.
▪️यासाठी विद्यार्थ्यांना बारावीचा पर्याय निवडावा लागेल.
▪️त्यानंतर हॉल तिकीट क्रमांक आणि इतर डिटेल्स भरल्यानंतर तुमचा निकाल तु्म्हाला कळेल.
▪️विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड देखील करु शकतात.