कांदा पिकाचे अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे .आ शंकरराव गडाख.
शासनाने विक्री झालेल्या कांद्याला जाचक अटी घालून प्रति क्विंटल 350 रु अनुदान जाहीर केले परंतु आजपर्यत शेतकऱ्यांना एक रुपयाही अनुदान देण्यात आले नाही.अवकाळी पावसाने शेतकरी पुरता अडचणीत सापडला असतांना खऱ्या मदतीची गरज असतांना देखील शासनाने केवळ मदतीची घोषणा केली आहे.
सदर घोषणेची तातडीने अंमलबजावणी करून
शेतकऱ्यांना अनुदान द्यावे व अनुदान देतांना घातलेल्या जाचक अटी शिथिल कराव्यात तसेच संपूर्ण नेवासा तालुक्यातील गावा गावात पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती जाने महिन्यापर्यत अनेक गावातील शेतात पाणीच पाणी होते
तरीही सापत्न वागणूक देऊन नेवासा तालुक्यातील 5 मंडले अतिवृष्टी मधून संतधार पाऊस दाखवून वगळण्यात आले आहे.
अतिवृष्टी अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेल्या नेवासा तालुक्यातील 5 ही मंडलाना
अतिवृष्टी अनुदान देऊन शेतकऱ्यांना शासनाने आधार द्यावा अशी मागणी गडाख यांनी केली तसेच
नव्याने सुरू करण्यात आलेली विकासकामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी लक्ष द्यावे असे आवाहन आ गडाख यांनी याप्रसंगी केले
याप्रसंगी माका गावचे सरपंच,उपसरपंच सर्व ग्राम प सदस्य,सोसा चेअरमन,व्हा चेअरमन संचालक आदींसह परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी माका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.