2023 चे श्री शनिजयंती महोत्सवात श्री.शनैश्वर देवस्थान ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुराव लक्ष्मण पाटील बानकर (भाऊ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ...
शनिरत्न पुरस्कार प्रदान सोहळा व श्री शनिलीलामृत ग्रंथ प्रकाशन सोहळा आमदार शंकरराव गडाख साहेब यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
यंदाचा शनिरत्न पुरस्कार ह.भ.प महंत उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर, संस्थापक, अध्यक्ष- ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम, नेवासा बुद्रुक यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रा.डॉ.शिवाजीराव दरंदले यांनी लिहिलेल्या शनीलीलामृत या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दै. सार्वमतचे संपादक मा.श्री अनंत पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज बोधले तसेच देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त मंडळ शिंगणापूर ग्रामस्थ व भाविक,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.