मुंबई पोलीस दलात दया नायक पुन्हा रुजू
मुंबई, दि. २० - एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून
ओळखले जाणारे दया नायक यांची मुंबई क्राइम ब्रँचमध्ये नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र
तीन वर्षांचा एटीएसमधील कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर दया नायक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक नऊ मध्ये रुजू झाले आहेत. गेल्या महिन्यात राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात चकमक फेम पोलीस निरीक्षक दया नायक यांची मुंबई पोलीस दलात बदली झाली.दया नायक हे दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत होते. २०२१ मध्ये एटीएसमधून त्यांची गोंदियात बदली केली होती.