नेवासा, दि. १८ (प्रतिनिधी) - वाळूचोरी रोखण्यासाठी नेवाशाचे तहसीलदार वाहनातून नदीपात्राकडे फेरफटका मारत असतांना कापूरडोह येथे एक थर्माकॉलचा चपू त्यांच्या निदर्शनासआला. त्याची पाहणी करण्यासाठी ते मोबाईलवर बोलत गेले असतांना एक पाय चपूवर ठेवलेला असतांना बोलण्याच्या नादात चपूपुढे सरकाला
अन् तहसिलदार पाण्यात पडले. सुदैवाने तहसिलदारांच्या चालकासह एका शेतकऱ्याने प्रसांगवधान राखून तहसिलदारांना सुखरुप पाण्यातून बाहेर काढले. ही घटना गुरुवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. चालकासह शेतकऱ्याने पाण्यात उडी घेतली. तहसिलदारांना सुखरुप पाण्यातून बाहेर काढले आणि त्यांचा पाण्यात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी
येथील एका शेतकऱ्याने डोहात बुडी घेवून मोबाईल शोधून तहसिलदारांच्या ताब्यात दिला.तहसिलदार बिरादार हे भिजलेल्या अवस्थेत वाहनात बसून निवासस्थानाकडे रवाना झाले या या घटनेमुळे बचाव करणाऱ्या शेतकरी व चालकाची कौतुक केल्याची चर्चा नेवासा तालुक्यात रंगली होती