नेवासा खरेदी विक्री संघ पदाधिकारी उद्या निवड अध्यक्ष-उपाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?
नेवासा :
तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची सोमवारी (दि.१०) निवड होणार आहे.
खरेद-विक्री संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.नेवासा तालुका सहकारी खरेदी-7 विक्री संघाची १७ जागांकरिता
निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.5 या संघावरआमदार शंकरराव गडाखांचे वर्चस्व आहे.
प्रभाकर कोलते, सुभाष चव्हाण,रवींद्र मारकळी, कैलास काळे, विजूचंद चरवंडे, सोपान चौधरी, मच्छिंद्र कडू,
युवराज तनपुरे, निवृत्ती थोपटे, बादशहा इनामदार, राजेंद्र पोतदार, संतोष फिरोदिया, रमेश गोर्डे, दीपक चौधरी,
जनार्दन पिटेकर, शुभांगी देशमुख,सुशिलाबाई शेटे आदी बिनविरोध झाले.