नेवासा प्रतिनिधी
नेवासा- शरणपूर वृद्धाश्रम येथे निराधारांना स्वादिष्ट जेवण देऊन वाढदिवस केला साजरा करण्यात आला...
नेवासा फाटा येथे राहत असलेले श्री नानासाहेब दानवे सर यांनी शरणपूर वृद्धाश्रम येथे असलेले वृद्ध व्यक्ती आणि आपल्या मित्र मंडळींना स्वादिष्ट जेवण देऊन अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करून तरुणाई पुढे एक आदर्श घालवून दिला.शैक्षणिक कर्यासोबतच भरीव असे सामाजिक काम करणारे आणि आपला माणूस हक्काचा माणूस म्हणून सर्वांना परिचित असलेल्या दानवे सरांनी नेहमीच वृद्धाश्रमाला विविध प्रकारची मदत केली आहे.समाजातील उपेक्षित,दुर्बल,निराधार घटकांना नेहमीच सामाजिक जाणिवेतून इतरांनाही प्रेरणा देणारे कार्य करणे हे आपले परमकर्तव्य आहे असे ते मानतात. मानवता हाच धर्म आणि माणुसकी ही जात मानून ते नेहमी विविध सेवाभावी कार्यात सहभाग घेतात.त्यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.शरणपूर वृद्धाश्रमातील संस्थापक अध्यक्ष श्री रावसाहेब मगर आणि व्यवस्थापक श्री संतोष मगर यांनी त्यांचा स्नेहवस्त्र आणि श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करुन सरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .यावेळी नेवासा नगर पंचायत चे नगरसेवक श्री सचिन भाऊ नागपुरे,पत्रकार सुधीर भाऊ चव्हाण,राजेश जाधव सर, रभाजी भोंडवे सर, आदित्य सिंग,जितेंद्र कुमार वैष्णव, पवन कुमार वैष्णव, बलदेवराम चाबरावाल , भूपेंद्र सिंग, आदी मान्यवर उपस्थित होते.