गंगापुर- न्यायालयाच्या आदेशानुसार लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणक प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पुर्वी पुर्ण करा.शेतकरी कृती समितीची मागणी..


गंगापूर प्रतिनिधी--

गंगापुर- न्यायालयाच्या आदेशानुसार लासुर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणक प्रक्रिया  ३० एप्रिल २०२३ पुर्वी पुर्ण करा.शेतकरी कृती समितीची मागणी..

जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, विभागीय सह निबंधक छञपतीसंभाजीनगर, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 
दि १०/४/२०२३ रोजी शेतकरी कृती समिती ता. गंगापूर च्या माध्यमातून शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांनी जिल्हा उप निबंधक, 
सहकारी संस्था, विभागीय सह निबंधक छञपती संभाजीनगर, पणन संचालक महाराष्ट्र राज्य,पुणे यांना डॉ. सुग्रिव सं. धपाटे  सह सचिव (पणन), महाराष्ट्र शासन यांनी क्रमांक कृपमं०१२३/प्र.क्र.४३/२१-स  दिनांक : ०६ एप्रिल २०२३ रोजी खुल्ताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे विलीनीकरण लासुर स्टेशन बाजार समिती मध्ये करण्याचे व लासुर स्टेशन बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचे निर्देश दिले होते. परंतु .न्यायालयाने राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार निवडणूक प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पुर्वी पुर्ण करण्याचे आदेश सहकारी संस्था  निवडणूक विभागाला दिले आहेत. 
सह सचिव पणन यांच्या पञानुसार जर लासुरस्टेशन बाजार समिती निवडणूक स्थगित करण्यात आली असेल तर न्यायालयाच्या आदेशानुसार दि ३० एप्रिल २०२३ पुर्वी नविन संचालक मंडळाची निवड होणे अपेक्षित आहे परंतु तसे न झाल्यास न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल किंवा आदेशाचा अवमान होईल. 
शेतकरी कृती समिती ता गंगापूर व लासुर स्टेशन बाजार समिती निवडनुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेल्या उमेदवारांच्या मार्फत शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांनी निवेदनाद्वारे जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, विभागीय सह निबंधक छञपती संभाजीनगर, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य,पुणे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात येते कि लासुरस्टेशन बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया दि ३० एप्रील २०२३ पुर्वी पुर्ण करण्यात यावी नसता - डॉ. सुग्रिव सं. धपाटे  सह सचिव (पणन), महाराष्ट्र शासन  यांच्या निवडणूक स्थगित निर्देशाच्या विरोधात  न्यायालयात दाद मागण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.