नेवासा- प्रतिनिधी
नेवासा- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी नेवासा शहर यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले..
नेवासा.
दि. ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी नेवासा शहराच्या वतीने गणपती चौक येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रवक्ते नितीनजी दिनकर, शहराध्यक्ष मनोज पारखे, नगरसेवक सुनीलजी वाघ, शहर उपाध्यक्ष राजेश कडू, कामगार आघाडी शहराध्यक्ष विवेक नन्नावरे, युवामोर्चा शहराध्यक्ष प्रतीक शेजुळ, श्रीकांत बर्वे, अजितसिंह नरूला, गोरक्षनाथ बेहळे, विलास बोरुडे, आकाश शेटे, संजय पवार, भास्कर कणगरे, विठ्ठल लोखंडे, सतिष गायके, कैलास परदेशी आदी उपस्थित होते.