नेवासा-श्रीराम साधना आश्रमात भक्त परिवाराच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह भंडारा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा प्रतिनिधी

 नेवासा-श्रीराम साधना आश्रमात भक्त परिवाराच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह भंडारा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माणसाला माणूस जोडून पारमार्थिक वैभव वाढविण्यासाठी महंत सुनीलगिरीजी महाराजांचे कार्य-अतुल महाराज आदमने

नेवासा 
तालुक्यातील मुकींदपूर शिवारात महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज यांनी स्थापित केलेल्या रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमाच्या वतीने  आयोजित भक्त परिवाराच्या सांस्कृतिक कार्यक्रमासह भंडारा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात भक्त परिवारातील सदस्यांनी भक्तीगिते,भावगीते, देशभक्तीपर गीते गाऊन केले उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
माणसाला माणूस जोडून पारमार्थिक वैभव वाढविण्यासाठी महंत सुनीलगिरीजी महाराजांचे कार्य असल्याचे गौरवोदगार हभप वाणीभुषण अतुल महाराज आदमने यांनी यावेळी बोलतांना काढले.

      यावेळी श्रीराम साधना आश्रमाच्या सभामंडपात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज यांच्या हस्ते उपस्थित संत महंतांचे संतपूजन करण्यात आले  तर श्रीराम जन्मोत्सव सोहळयात तन मन धनाने योगदान देणाऱ्यांचा यावेळी त्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पुढील वर्षी श्री राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा होणार असल्याचे महंत सुनीलगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना जाहीर केले.
     पुढील कथेची तयारी म्हणून उपस्थित भाविकांनी लगेच
मोठ्या स्वरूपातील वर्गणी देण्याचे व्यासपीठावर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी जाहीर केले.सर्व भक्तांना पारमार्थिक आनंद देण्यासाठी भगवंत चांगल्या कामाच्या मागे उभा रहातो व 
पारमार्थिक वैभव वाढविण्यासाठी कार्य करून घेतो हे भव्य दिव्य सोहळयाने सिद्ध झाले असल्याचे महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
    यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीराम साधना आश्रमाच्या भक्त परिवाराच्या वतीने प्रा.देविदास साळुंके सर,
राहुरीचे राजेश मनचरे,पत्रकार सुधीर चव्हाण, सौ.सीमंतिनी बोर्डे,शांताराम राऊत,संजय गोंडे यांनी देशभक्तीपर व भक्ती गीते गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.गायक संजय गोंडे यांच्या वाद्यवृंदांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली.या कार्यक्रमाचा
महंत स्वामी सुनीलगिरी महाराज यांच्यासह साध्वी सुवर्णानंद चैतन्य,अतुल महाराज आदमने,महंत पंचमपुरी महाराज, बाबासाहेब महाराज घायाळ,लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, कल्याण महाराज पवार,साहेबराव महाराज चावरे,घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,दत्तात्रय कांगुणे,युवा नेते चंद्रशेखर गटकळ,गणेश चौघुले यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.प्रा.अशोक गाडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.