नेवासा प्रतिनिधी-
नेवासा-लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेला ५४ लाखाचा नफा.....
पतसंस्थेचा कारभार अधिकाधिक पारदर्शी करू- नंदकुमार पाटील..
कुणाशीही स्पर्धा न करता व्यापारी,ठेवीदार कर्जदार यांना चांगली सेवा देऊन विश्वासास पात्र ठरलेल्या नेवासा येथील लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील पतसंस्थेस स.न. २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५४ लाख रुपयांचा नफा झाला असून पतसंस्थेचा कारभार अधिकाधिक पारदर्शी करू अशी ग्वाही पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.नंदकुमार पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
यावेळी अधिक माहिती देतांना पतसंस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार पाटील म्हणाले की आजच्या परिस्थितीत उदयोग,व्यवसायावर सर्वत्र दुष्काळाचे सावट पसरलेले असताना पतसंस्थेचे सर्व संचालक कर्मचारी,प्रतिनिधी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत संस्थेच्या पारदर्शी कार्यातून प्रगतीचा आलेख उंचावत असल्याने २०२२-२३ या आर्थिक वर्षात संस्थेला हा ५४ लाखाचा नफा झाला असून सद्या पतसंस्थेच्या ४१ कोटी ९९ लाखांवर ठेवी असून २८ कोटी ३० लाख रुपयांचे कर्ज वाटप पतसंस्थेने केले आहे.तर १७ कोटी ९७ लाखांची गुंतवणूक केली आहे,६४ लाख ३२ हजार इतके पतसंस्थेचे भागभांडवल असून ३ कोटी ८० लाख इतका निधी आहे.
लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये पतसंस्थेचे उपाध्यक्ष महंमदभाई शेख टेलर, संचालक डॉ.भाऊसाहेब घुले, अँड.बाळासाहेब शिंदे, बजरंग ईरले, विकास शेंडे, आण्णा जाधव, राम कदम, दीपक दुधे, महिला प्रतिनिधी सौ.कांचनमाला विजय गांधी, सौ.वैशाली देशमुख यांच्यासह सर्व कर्मचारी,प्रतिनिधी,वसुली अधिकारी, ठेवीदार कर्जदार, हितचिंतक यांनी दिलेल्या खंबीर साथीसह व पाठबळामुळे पतसंस्थेने हे यश विश्वासाच्या जोरावर संपादन केले असल्याचे नंदकुमार पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या ओढावलेल्या बिकट आर्थिक परिस्थितीवर मार्ग काढत सभासद हितचिंतक ठेवीदार यांची साथ व पतसंस्थेवर असलेला विश्वास आज पतसंस्थेच्या उत्कर्षाकडे चाललेल्या वाटचालीस कारणीभूत ठरत आहे त्याबद्दल मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो अशीच खंबीर साथ व पाठबळ पतसंस्थेला देत रहावे,सभासद ठेवीदार व खातेदार यांच्याबरोबर हातात हात घालून संस्थेचा कारभार अधिक पारदर्शी करण्याचा आपण प्रयत्न करू अशी ग्वाही ही नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.
पतसंस्थेला ५४ लाखांचा नफा मिळाल्याबद्दल अध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष महंमद शेख टेलर, व्यवस्थापक अंकुश धनक यांच्यासह सर्व संचालक कर्मचारी प्रतिनिधी यांचे सभासदांनी अभिनंदन केले आहे.