पंतप्रधान मुद्रा लोण व इतर कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंक व्यवस्थापकांवर कारवाई .


गंगापूर प्रतिनिधी--

गंगापूर- पंतप्रधान मुद्रा लोण व इतर कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंक व्यवस्थापकांवर कारवाई करुन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरपाई पगारातून कापून घ्या असे आमदार प्रशांत बंब यांनी 
बँक व्यवस्थापकांच्या बैठकीत सांगितले.

पुढे बोलताना आमदार बंब म्हणाले की शेतकऱ्यांना दिलेले अनुदानाचे पैसे कोणत्याही बॅंकेने कर्ज खात्यात जमा करु नये ज्या बॅंकेने शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे कर्ज खात्यात जमा केले असतीलतर ते पैसे त्यांना परत करावे शासनाने दिलेले अनुदान हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे. आमदार प्रशांत बंब  यांच्या प्रमुख उपस्थितीत ११ एप्रिल रोजी  गंगापूर तालुक्यातील बॅंक व्यवस्थापकांची बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत, वार्षिक कर्ज योजना(ACP), विविध आर्थिक समावेशक योजना, पीक कर्ज वाटप, किसन क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसायातील लाभार्थ्यांची परिपूर्णता मोहीम, जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत प्राधान्य क्षेत्रात कर्ज देण्याच्या उपलब्धींचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय बैठकीदरम्यान पंतप्रधानांच्या प्रमुख योजना, वार्षिक कर्ज योजनेंतर्गत उपलब्धी, 
 पीक कर्ज वितरण, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी दिल्या जाणारे कर्ज या मुद्यांसह प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), प्रधानमंत्री मुद्रा योजना(PMMY), स्टँड अप इंडिया, बचत गट(SHG), पर्यायी गुंतवणूक निधी (AIF), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, (PMFME) पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांची कृष्णा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत परिपूर्णता, परवडणार्‍या घरांसाठी कर्ज पुरवठा, सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत दाव्यांची स्थिती यारसारख्या आत्मनिर्भर भारत आर्थिक मदत आणि सरकार अनुदानित योजनांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. 
या बैठकीला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, नाबार्डचे व्यवस्थापक सुरेश पटवर्धन, सहाय्यक निबंधक किरण चौधरी, गटविकास अधिकारी संजय गायकवाड, प्रक्षीशणार्थी तहसीलदार आकाश दहाडे, जिल्हा समन्वयक समाधान सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती . महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी देखील बैठकीत सहभागी झाले होते.
 या बैठकीला माजी नगरसेवक प्रदीप पाटील, मारुती खैरे, माजी उपसभापती सुमित मुंदडा, दिपक साळवे,गोपाल वर्मा, कृष्णकांत व्यवाहारे, अतुल रासकर, प्रशांत मुळे, दिपक बडे,रतन बत्तीसे हशम पटेल, भगवान बोर्डे, आबासाहेब सरोवर, सचिन क्षिरसागर, नंदु सजगुरे, राजेंद्र राठोड, सुर्यकांत थोरात, संजय अभंग,बाळु बोकडीया, भगवान गाढे, आप्पासाहेब पाचपुते, आदींसह शेतकरी सर्व बॅंकेचे व्यवस्थापक, सरपंच, उपसरपंच कर्मचारी उपस्थित होते.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका व्यवस्थापक यांनी त्रोटक माहिती घेऊन लिपीकाला पाठवल्यामुळे आमदार बंब यांनी आठ दिवसांच्या आत किती कर्ज पुरवठा करण्यात आला यांची माहिती शाखा निहाय मागुन बैठकीत तालुका व्यवस्थापक गैरहजर असल्याने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले तसेच तालुक्यातील सर्व बॅंकांनी कर्जासाठी लागणारे कागदपत्र यांची यादी बॅंकेत दर्शनी भागात लावावी व कोणत्याही कर्जासाठी लाभार्थी यांची अडवून करु नये त सेच दिलेले उद्दिष्ट पुर्ण करावे असे सांगितले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.