*श्री.प्रकाश दिलवाले यांची आज पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली*
पैठण:- तुषार महालकर
पैठण;- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मा मुख्यमंत्री श्री शरदचंद्रजी पवार , प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील , मा. उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ , मा. मुख्यमंत्री अजित दादा पवार, संपर्क प्रमुख राजेश टोपे , छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील, मा आ संजय भाऊ वाकचौरे, रा काँ पार्टी नेते दत्ताभाऊ गोरडे साहेब, पैठण पैठण तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पाटील निर्मळ, पैठण शहर अध्यक्ष जितूभाई परदेशी, आमचे मार्गदर्शक रा. काँ. पार्टीचे *जिल्हाकार्याध्यक्ष मनोज भाऊ घोडके* यांच्या हस्ते पक्ष वाढीसाठी पैठण तालुका कार्याध्यक्ष पदि नियुक्ती पत्र प्रदान केले आहे.
श्री.प्रकाश दिलवाले यांची आज पैठण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी नियुक्तीपत्र देताना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ओबीसी समाजभुषण मनोजजी घोडके साहेब, पैठण तालुका समता परिषद ता. अध्यक्ष देविदास सोणवने, सरपंच श्रीराम बनकर, युवा नेतृत्व शुभम भैय्या गायकवाड, गणेशजी तळपे, कारभारी सोणवने, आदि ची उपस्थिती होती.
श्री प्रकाश दिलवाले यांची *पैठण तालुका कार्याध्यक्ष* पदि निवड झाल्याबद्दल कार्यकत्यानी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. अमोल भैय्या विर, पुंजाराम व्यवहारे विष्णू बनकर सूनिल बनकर व सहकारी मंडळी उपस्थित होते.
नवनिर्वाचीत तालुका कार्याध्यक्ष श्री प्रकाश दिलवाले यांनी पक्ष वाढिसाठी प्रामाणिक कार्य करण्याची ग्वाही देत सर्व नेते यांचे मार्गदर्शन व सहकारी यांचे सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त केली. पक्षाकार्यासाठी झोकुन देऊन कार्य करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी सर्व सहकारी व जेष्ठ मार्गदर्शक नेते यांचे मनःपुर्वक आभार श्री प्रकाश दिलवाले यांनी व्यक्त केले.