नेवासा प्रतिनिधी-
नेवासा-भीम जयंतीच्या निमित्त नेवासा येथे डॉ.आंबेडकर यांच्या तीस फुटी प्रतिमेस सुखदान दाम्पत्याच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला.
नेवासा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीस फूट प्रतिमेस जनसेवक संजय सुखदान व सौ.शालिनीताई सुखदान यांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक घालण्यात आला.यावेळी "जयभीम"भारतरत्न विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा जयघोष करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने
ठीकठिकाणी अभिवादन करण्यात आल्याने नेवासा शहर भीममय बनले होते.चौकाचौकात निळे झेंडे,व लावलेले बॅनर नागरिकांचे आकर्षण ठरले होते. नेवासा पंचायत समितीच्या गेट जवळ उभारण्यात आलेल्या शामियान्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अभिवादन करण्यासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी याच चौकात उभारण्यात आलेल्या तीस फूट उंचीच्या महामानवाच्या प्रतिमेस जनसेवक संजय सुखदान व नगरसेविका सौ.शालिनीताई सुखदान यांच्या हस्ते क्रेनद्वारे दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,भाजपचे ज्ञानेश्वर पेचे,नगरसेवक अल्ताफ पठाण,मुन्ना शेख,काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजनदादा जाधव,यशवंत स्टडी क्लबचे महेश मापारी,प्रेस क्लबचे संस्थापक गुरुप्रसाद देशपांडे, पत्रकार अशोक डहाळे, ।मास्टर सुरेश लव्हाटे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंता नळकांडे, इसहाकभाई मणियार, राजमहंमद शेख,अंजुम पटेल,युसूफ शेख, अस्लम मन्सूरी,रविंद्र रणशिवरे,अँड.काका गायके,भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे,निरंजन डहाळे,प्रतीक शेजुळ,अजित नरुला,राजेश कडू,नगरसेवक संदीप बेहळे,राजू मुथा, जयकुमार गुगळे,विष्णू इंगळे,भास्कर कणगरे,शिवा राजगिरे, निखिल चंदानी, दत्तात्रय काळे,अजय त्रिभुवन,आम आदमी पार्टीचे अँड.सादिक शिलेदार,संदिप आलवणे,मनसेचे रविंद्र पिंपळे,पृथ्वी सुखदान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र पोतदार यांच्यासह सर्वधर्मीय सर्वपक्षीय बांधव विविध जातीधर्माचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर सिद्धार्थ सुखदान यांनी आभार मानले.