नेवासा :
ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टीने पिकांचे सर्वाधिक नुकसान होऊनही वडाळा बहिरोबा मंडळ अनुदानापासून
बंचित आहे.
अनुदान वाटपात वशिलेबाजी झाल्याचा आरोप नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबाचे सरपंच
ललित मोटे यांच्यासह शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न
मिळाल्यास नगर-छत्रपती संभाजीनगरमहामार्गावर 'रास्ता रोको' करणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनात म्हटले की, गेल्या वर्षी
ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी होऊनहीनुकत्याच या अनुदान वाटपातून वडाळा बहिरोबा मंडळास वंचित ठेवण्यात आले. अतिवृष्टोच्या नुकसानीची संबंधित
तलाठ्यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करूनही अनुदान वाटपातून वगळण्यात आल्याने या
अनुदान वाटपात मोठ्या प्रमाणावर वशिलेबाजी झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याकडून केला जात आहे. निवेदन देतेवेळी सरपंच ललित मोटे, उपसरपंच
सचिन मोटे, लक्ष्मण मोटे, निखिल मोटे,माजी उपसरपंच बाबामाहव मोटे,श्रीकांत मोटे, सुनील पतंगे, नानासाहेब
मोटे, राहुल मोटे, सुरेश राऊत,बाळासाहेब जामकर, विठ्ठल पवार उपस्थित होते.