आज दि. २ एप्रिल २०२३ रोजी नेवासा पंचायत समितीच्या आवारात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली..



आज दि. २ एप्रिल २०२३ रोजी नेवासा पंचायत समितीच्या आवारात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली..

नेवासा
  या प्रसंगी नेवासा शहर व तालुक्यातून  मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नेवासा शहर तालुक्यातील विविध ठिकाणांचे  जयंतीचे नियोजन पार पडले .
तालुक्यातील जयंत्या या डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती या नावाने घ्याव्यात,जयंती कोणत्याही एका पक्षाची एका जाती किंवा धर्माची नसेल, तसेच या बैठकीत दि. १४ एप्रिल जयंती दिनी तालुक्याभरात विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम , व मिरवणूक तारखा खालील प्रमाणात ठरवण्यात आल्या   
•••१४ एप्रिल  घोडेगाव 
•••१५ एप्रिल नेवासा शहर
•••१६  एप्रिल नेवासा फाटा
            या प्रसंगी  बैठकीत जयंती संबंधी विविध नियम ठरवण्यात आले ,डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे एक जाती किंवा धर्माची नसून आपण पाहिले आणि शेवटचे भारतीय आहोत,म्हणून
१) संपूर्ण नेवासा तालुक्यातील जयंती ही ''महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती"  या नावाखालीच काढावी.
२) बोर्ड व बॅनर लावतांनी त्यावर महामानव "डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती" या नावाचा व समितीने ठरवून दिलेल्या सिम्बॉल चा  वापर करावा , कोणीही वैयक्तिक कोणाचा ही फोटो वापरून नये  , खाली नाव किंव्हा दुकानचे नाव वापरू शकता .
३) मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या कोणत्याही नागरिकाने. दारू पिऊन मिरवणुकीत येऊ नये..
४) आम्ही इतर देनद्यांचा ही आदर करतो परंतु जयंती ही महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची असलेल्या कारणाने  जयंतीत फक्त महामानवाच्या विचारांचा निळा झेंड्याचाच वापर करावा , कोणीही इतरत झेंडे मिरवणुकीत आणि नये .. व सामाजिक सलोखा कसा राखता येईल याचा विचार करावा 
५) या जयंतीत कोणीही  नेता, कार्यकर्ता  नसल्याकारणाने 
कोणीही कोणाला अंगावर उचलून घेऊन नाचू नये , व गाण्यांची फार्माईश करू नये , जयंतीत फक्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांचे गाणे वाजवली जातील ...
६) ही जयंती कोणत्याही जाती - धर्मांची नसून सर्व भारतीय म्हणून साजरी केली जाणार आहे 
          सदर बैठकीत तालुक्यातून मोठ्या संख्येने  नागरिक उपस्थित होती ,या प्रसंगी  
   डॉ. कारण घुले ,विकास चव्हाण ,  मनोज पारखे, रामराज्य उत्सव समितीच्या वतीने सर्व कार्यकर्ते यामध्ये सार्थक परदेशी,  सचिन भांड ,प्रतिक शेजुळ, जालू गवळी  आंबेडकरी चळवळीतील संजय सुखधान  बाळासाहेब केदारे , रविकुमार भालेराव,सुशील धायजे , पप्पू इंगळे, रविभाऊ आल्हाट, राहुल वाघमारे ,संजू पवार , निखिल चांदणी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते , 
   तसेच  नेवासा शहरातील जयंती साठी वर्गणी  आम्ही जमा करणार नाही परंतु  स्व ईच्छा ने जतन दययची असेल त्यांनी 8412897889 या नंबर वर गुगल पे ला टाकावी,
याप्रसंगी बोलताना    डॉ. कारण घुले ,विकास चव्हाण ,  मनोज पारखे राविभाऊ आल्हाट रविकुमार भालेराव  यांनी भाषणे व कार्यक्रमाची रूपरेखा दर्शवली , समारोप पर भाषण संजय सुखाधन यांचे झाले नेवासा शहर , व तालुका जयंतीचे  नियोजन सांगितले  व  तालुक्यात जयंती उत्साहात पार पाडावी असे आवाहन संजय सुखदान यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने केले आहे।
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.