नेवासा- नेवासा बस स्थानकामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी,उपस्थित प्रवाशांना केले रसाचे वाटप
नेवासा
नेवासा येथील एस.टी. बस स्थानकामध्ये विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले.यावेळी जयघोष करत उपस्थित प्रवाशांना केले उसाच्या थंडगार रसाचे वाटप करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे राजेंद्र काळे, पप्पू परदेशी, कृष्णा परदेशी, प्रवासी संघटनेचे सचिव पत्रकार सुधीर चव्हाण, आयोजक अविनाश खंडागळे, संजू पवार, निलेश शेंडगे, अक्षय चांदणे, गटण्या पवार, संदीप चांदणे, बबनराव ओनावळे, सुलतान शेख, रोहित वाघमारे, अमोल जगधने, विठ्ठल बोर्डे, शंकर मैंदाड, वाहतूक नियंत्रक गायकवाड यांच्यासह चालक वाहक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित प्रवाशांनी पुष्पांजली अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करून
उपस्थित प्रवाशांना उसाच्या ताज्या रसाचे वाटप करण्यात आले.