नेवासा येथे रामनवमी मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

 
रामराज्य उत्सव समिती व सकल हिंदू समाजाच्या
वतीने नेवासा येथे प्रभू रामचंद्रांची मिरवणूक  तसेच आयोजक तुम्ही व आम्ही व समस्त हिंदू बांधव
मिरवणुक मोठा जल्लोषात  नेवासा येथे संपन्न.

नेवासा
प्रभू श्रीरामजन्मोत्सवाच्या निमित्ताने नेवासा येथे रामराज्य उत्सव समिती व सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी दि. २९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता
प्रभू रामचंद्रांची शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचे हजारो रामभक्तांनी प्रभू रामचंद्र भगवान की जय असा जयघोष करत स्वागत केले.
मिरवणुकीत हजारो युवा श्रीराम भक्तांचा सहभाग हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या हस्ते अकरा फुटी उंचीच्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी
जांब समर्थ येथील हभप बाळासाहेब महाराज नाईक, मध्यमेश्वर मंदिराचे प्रमुख महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज,उपस्थित होते. यावेळी रामराज्य उत्सव समितीच्या वतीने उपस्थित संत महंतासह
उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रभू श्रीराम चंद्राच्या निघालेल्या मिरवणुकीत
अग्रभागी अंगात भगवा कुडता व हातात
भगवे झेंडे घेतलेले युवा श्रीराम भक्त
गंध तिलक करून मिरवणूकीत सहभागी
झाले होते. त्याच बरोबर विविध पक्षाचे
पदाधिकारी यांनी देखील मिरवणुकीत सहभाग घेतला होता
यावेळी  रामभक्तांना श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात
महाप्रसाद ठेवण्यात आला होता मिरवणूक समारोपा नंतर हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी स्वयंसेवकांनी देखील आपले कार्य चोक पद्धतीने
पार पाडले युवकांचे ग्रुप तयार करून कामे वाटप करण्यात आली होती यावेळी अनेक
स्वयंसेवकांनी आपआपली जबाबदारी सुरळीत पार पाडलेली पहावयास मिळाली
श्री क्षेत्र देवगड दत्त पिठाचे महंत गुरुवर्य
सहभाग घेऊन प्रभू श्री रामचंद्रांच्या धार्मिक
गीतांवर डीजेच्या तालावर आनंद व्यक्त केला प्रभू
श्री रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की
जय असा जयघोष केला.
महाबली हनुमान व त्यांची वानरसेना सर्वांचेच 
आकर्षण ठरले होते. सदरची शोभायात्रा
निघालेल्या शोभायात्रा प्रसंगी मिरवणूक ही मळगंगादेवी
मंदिर चौक, एस टी स्टैंड , नेवासा शहराच्या चौक, श्री खोलेश्वर गणपती चौकाचौकात भगवे झेंडे व
मंदिर चौक, नगरपंचायत कमानी लावल्याने नेवासा
चौक, मुख्य बाजारपेठेतील नगरीचे वातावरण प्रभु
रामचंद्रमय बनले होते. श्रीराम शोभा यात्रा उत्सवा
चौकाचौकात तोफांची सलामी देत 
करण्यात आले यावेळी उत्स्फूर्त पणे महिला मंडळाने शोभा यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवला 
यावेळी श्रीराम प्रभू यांचे परमभक्त श्री महाबली हुनमान यांचे मुख्य आकर्षण या शोभायात्रे दरम्यान बघायला मिळाले व शोभायात्रेचा आनंद दुगुणित झालेला
पहावयास मिळाला शोभा यात्रा दरम्यान रामराज्य उत्सव समिती कडून नियमांचे काटेकोर पालन करण्यात आल्याने शिस्तबद्ध शोभा यात्रा झाल्याने सर्वत्र
कौतुक केले जात होते.
रामराज्य उत्सव समितीच्या सर्व सदस्यांचे अथक परिश्रम रामराज्य उत्सव समितीच्या सर्व
सदस्यांनी घेतलेल्या अथक परिश्रामुळे शहरात भूतो न भविष्यती व अभूतपूर्व
अशी भव्य श्रीरामनवमी शोभायात्रा संपन्न झाली समितीच्या सर्व रामभक्त तमाम नेवासकर तसेच पोलिस यंत्रणेने देखील अथक परिश्रम घेतल्याचे पहावयास
मिळाले.समितीच्या वतीने लावण्यात आलेले
भगवे झेंडे, झालर, कमानी, लावलेले बॅनर
हे नेवासकरांचे व मिरवणुकीतील श्रीरामभक्तांचे खास आकर्षण ठरले. सदरची
मिरवणुक प्रत्येक चौकात आल्यानंतर रामभक्तांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत
करण्यात आले. जुन्या पेठेत असलेल्या श्रीराम मंदिरात मिरवणुकीचा समारोप
करण्यात आला. सदर मिरवणूकीच्या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरच्या अप्पर
पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, शेवंगाव
उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,
पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे
पोलीस निरीक्षक विजय करे गृहरक्षक दलाचे
समादेशक अधिकारी बाळासाहेब देवखिळे
यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त
ठेवण्यात आला होता.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.