*वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका व नेवासा शहर यांच्या वतीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी (आण्णा)डोईफोडे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन केले स्वागत.

*वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका व नेवासा शहर यांच्या वतीने नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी (आण्णा)डोईफोडे यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन केले  स्वागत.

प्रतिनिधी-हरिश चक्रनारायण*
नेवासा दि.०५मार्च २०२३रोजी नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय करे यांची कर्जत या ठिकाणी नुकतीच बदली झाली,त्यांच्या जागेवर नांदेड जिल्ह्यातील बेलोरी येथून आलेले पोलीस निरीक्षक शिवाजी (आण्णा) डोईफोडे यांनी नेवासा पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार  स्वीकारला.*
*यावेळी केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण,नेवासा शहराध्यक्ष अफरोजभाई सय्यद व वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच घेतली नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांची सदिच्छा भेट व वंचित बहुजन आघाडी नेवासा तालुका व नेवासा शहर व वंचितच्या पदाधिकारी यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.*
*यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीशदादा चक्रनारायण व नेवासा शहराध्यक्ष अफरोज भाई सय्यद यांनी वंचित पदाधिकारी सोबत नेवासा पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांची सदिच्छा भेट घेतली व अर्धा तास झालेल्या चर्चेत पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी वंचितच्या पदाधिकारी यांना आश्वासन दिले की नेवासा तालुका व शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व नेवासा पोलीस ठाण्याचा कारभार चोखपणे बजावण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली.*
*यावेळी वंचितचे तालुकाध्यक्ष हरिश चक्रनारायण यांनीही पोलीस निरीक्षक डोईफोडे यांना सांगितले की वंचित बहुजन आघाडी प्रत्येक चांगल्या कामात भक्कमपणे आपल्याबरोबर खांद्याला खांदा देऊन सहकार्य करेल.वंचितचे नेवासा शहर अध्यक्ष अफरोजभाई सय्यद यांनी अतिक्रमण धारक गरीब व्यावसायिक यांना न्याय मिळवून देणे कामी तसेच नेवासा नगरपंचायत यांनी अतिक्रमणात ज्यांची दुकाने केली आहेत त्यांनाच नवीन बांधकाम केलेल्या इमारतीमध्ये व्यवसाय करण्यासाठी गाळे देण्यात यावेत यासाठी आपण वयक्तिक लक्ष द्यावे अशी विनंती केली असता यावर आपण लक्ष घालू असे पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी सांगितले.*यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुकाध्यक्ष हरिश चक्रनारायण व वंचितचे नेवासा शहर अध्यक्ष अफरोजभाई सय्यद यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांचे स्वागत केले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेवासा तालुका अध्यक्ष हरीश चक्रनारायण,नेवासा शहराध्यक्ष अफरोजभाई सय्यद, नेवासा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब गव्हाणे,नेवासा तालुका संपर्कप्रमुख आंतोन भाऊ गोर्डे, संघटक गोरख बर्वे, देवसडे शाखाध्यक्ष योगेश बोर्डे, नितीन वाघमारे, पत्रकार रमेश राजगिरे, भवाळ मामा,आदी वंचितचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.