.......अहमदनगर जिल्ह्यात दाेन नवे तहसीलदार
अहमदनगर.
नगरचे तहसीलदार उमेश पाटील यांची देवलापार (जि. नागपूर) येथे अपर तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर धुळे येथील अपर तहसीलदार संजय शिंदे यांची बदली करण्यात आली. नेवासे येथील तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही.
सुराणा यांच्या जागेवर परभणी येथील तहसीलदार संजय बिरादार यांची बदली करण्यात आली आहे, हा बदलीचा फतवा राज्य शासनाने काढला आहे
राज्य शासनाने राज्यातील ३६ तहसीलदारांच्या तडकाफडकी बदल्या करण्यााचा निर्णय घेतला. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील दाेन तहसीलदारांचा यात समावेश आहे.