नेवासा
नेवासा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय करे यांची नेवासा येथून बदली झाल्यावर नेवासा तालुक्यातील अनेक व्यापारी, शेतकरी, विविध संघटनेचे कार्यकर्ते ,तसेच अनेक पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी तसेच पत्रकारांनी व अनेक मान्यवरांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे येऊन कर्तव्यदक्ष अधिकारी विजय करे साहेब यांचे नेवासा तालुक्यात केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांचे कौतुक करुण निरोप दिला यावेळेस तालुक्याला लाभलेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी विजय करे साहेब यांच्यामुळे नेवासा मोहिनीराज देवस्थान ची यात्रा शांततेत व सुव्यवस्थेत तसेच हिंदू मुस्लिम समाजातील सर्वांनी यात्रेचा आनंद मनसोक्तपणे विजय करे साहेब यांच्या मुळे घेता आल्याचे बोलले तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे काम योग्य रीतीने केले .करे साहेब तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचे आपुलकीच्या भावनेने काम करत
प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत त्याच्या समस्येचे निरसन होत नाही तोपर्यंत त्यांना वेळ देऊन आपल्या केबिन मध्ये बसून त्यांच्या समस्याच्या निराकरण करणारा अधिकारी होते.आपुलकी व आधाराच्या भावनेने अडचण समजून घेणार व योग्य न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे अधिकारी असल्याचे अनेक शेतकरी व व्यवसायिक आपापल्यात चर्चा करत होते यावेळेस पोलीस स्टेशनचे अनेक पोलीस कर्मचारी कर्तव्यदक्ष विजय करे साहेब यांची कामगिरीची चर्चा करत होते. नेवासा तालुक्याला करे साहेब यांच्या रूपाने कोहिनूर हिरा लाभला होता असे तालुक्यातील नागरिक म्हणत होते.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील पोलीस अधीकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. कोरोना संकट काळानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली आहे.