. *प्रशांत गडाखांवर वीज चोरीचा गुन्हा दाखल
सोनई
दहा वर्षांपूर्वी घडलेल्या नेवासे तालुका दूध संघाच्या वीजचोरी प्रकरणी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्यासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सन २०१२ ते २०१५ मधील संचालक व समितीवरील सदस्यांचा समावेश आहे. सोनई पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे वसई (पालघर)चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय सुदर्शन सिंह यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात वीजचोरीची फिर्याद दिली होती. ती फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात वर्ग झाली आहे. त्याद्वारे प्रशांत गडाख त्यांचे चुलतभाऊ प्रवीण गडाख, अध्यक्ष गणपत चव्हाण व अन्य सोळा जणांवर गुन्हा दाखल केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी सांगितले.