*अहमदनगर जिल्ह्याला पु.अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी सकल हिंदू समाज आंदोलनाच्या पावित्र्यात*
अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा चांगलाच जोर धरताना बघायला मिळत आहे, जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अनेक नेते अहमदनगर चे नामांतर पु.अहिल्यादेवी होळकर करण्यात यावे या करिता पुढे सरसावत आहे, नामांतरासाठी काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात आले होते, नेवासा तालुक्यातील सकल हिंदू समाजाकडून नामांतराची मागणी करण्यात येत आहे, महाराष्ट्र ध. समाज संघटक महेंद्रभाऊ नजन व श्रीरामभैया देशमुख यांनी सर्व हिंदू समाज संघटनांना संघटित करून नामांतरसाठी येत्या काही दिवसांत तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे बोलताना सांगितले आहे.
नेवासा तालुक्यामध्ये महेंद्रभाऊ नजन आणि श्रीरामभैया देशमुख यांच्याकडून नामांतरासाठी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी घोंगडी बैठका घेण्यात येत आहेत अहमदनगर जिल्ह्याची कन्या जगातील एकमेव पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांनी त्यांच्या राजवटीत मोघलांकडून नष्ट केलेली अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करून हिंदू धर्माला नवसंजीवनी देण्याचे कार्य केले आहे. नेवासा तालुक्यातील हिंदू समाज संघटित करून अहमदनगर जिल्ह्याला पु.अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी लढा देणार असल्याचे महेंद्रभाऊ नजन यांनी सांगितले आहे.हिंदुधर्मरक्षित्या पु. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला मिळाले तर ही आम्हा नगर वासियांसाठी अभिमानाची बाब ठरणार आहे पु.अहिल्यादेवी होळकरांचे कार्य संपूर्ण जगाला प्रेरणा देत आहे, त्या जगातील एकमेव अश्या महाराणी आहेत कि त्यांना उत्तम शासक म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म अहमदनगर येथील चौडी या ठिकाणी झाला, कर्तुत्वाचा चारीत्याचा आणि नेतृत्वाचा आदर्श ज्या श्रेष्ठ स्त्री कडून घ्यावा अशी स्त्री म्हणजे माता पु.अहिल्यादेवी होळकर असे प्रतिपादन यावेळी श्रीरामभैया देशमुख यांनी केले आहे, नेवासा तालुक्यातील बैठका सत्र आणि नामांतरासाठीची जोर धरू लागलेली बघता येत्या काही दिवसांमध्ये एक मोठ्या ताकतीचे आंदोलन उभे होणार असल्याची चाहूल तालुक्यात बघायला मिळत आहे.