नेवासा
नेवासा येथील श्रीमती रुक्मिणी सुखदेव सावंत यांनी श्री.ए.जे.पवार दुय्यम निबंधक नेवासा, हे सतत दस्त रजिस्टर साठी कायम भ्रष्टाचार करतात असा थेट आरोप केला आहे व विविध कार्यालयांना तक्रारी अर्ज केला आहे त्या अर्जात त्यांनी असे लेखी दिले आहे की दुय्यम निबंधक पवार
https://youtu.be/ygsQeRW5pBk
व त्यांचा मुलगा किरण पवार यांचेकडे मी दिनांक २८/०३/२०२३ रोजी दस्त नोंदणी केली होती सदर दस्त
नक्कल मागणी साठी दिनांक २९/०३/२०२३ रोजी सकाळी ११ वाजता ऑफिसमध्ये गेले असता त्यांनी
मला सदर दस्ताची नोंदणी फी पावती (वरचे पैसे), मागितले . सदर अधिकारी यांना माझी पैसे
देण्याची इच्छा नाही. किंवा पावती फी Online भरलेली असताना सदर अधिकारी राज रोस पणे
लाच मागत आहे. तरी त्यांना मी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी माझ्याशी अरेरावीची भाषा
केली.पैसे न देता थोबाड घेऊन कुठे निघून गेली. तसेच धार्मिक उपवास करण्याचे तुझे काय कारण
अशा अवाच्य शब्दात माझ्याशी गैरवर्तवणूक व माझ्या भावना दुखावल्या आहेत. सदर अधिकारी
यांनी एजंट मार्फत लाच स्वीकारण्या करता 2 ते 3 खाजगी इसम कार्यालयात ठेवलेले आहेत. तसेच
त्यांचा मुलगा हा ही त्यांना मदत करतो. तरी सदर लोकसेवका विरुद्ध माझी कायदेशीर फिर्याद/
तक्रार असून मला योग्य तो न्याय द्यावा. याकरिता श्रीमती रुक्मिणी सुखदेव सावंत यांनी. जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर
जे.डी.आर साहेब अहमदनगर,
पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर,आय जि आर साहेब पुणे.तहसीलदार साहेब नेवासा.
यांच्याकडे दुय्यम निबंधक पवार यांच्यावर कारवाई होण्यासाठी तक्रारी अर्ज केले आहे.