*के. व्हीं. के. दहिगाव ने येथे सेंद्रिय शेती आणि लघु दुग्ध व्यवसाय विषयी कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन*
*जास्तीत जास्त तरुणांनी प्रशिक्षणात सहभागी व्हावे - शास्त्रज्ञ नारायण निबे आणि डॉ. चंद्रशेखर गवळी*
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने मा.आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, मा. आ. चंद्रशेखर घुले पाटील, डॉ. क्षितिज घुले पाटील व संस्थेचे विश्वस्त यांचे मार्गर्शनाखाली कार्यरत असून भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचे अंतर्गत, भारतीय कृषि कौशल्य परिषद माध्यमातून *कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने* ता.शेवगाव, जि.अहमदनगर यांचेद्वारे ग्रामीण भागातील युवक व शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती व लघु दुग्ध व्यवसाय या शेती पुरक उद्योग उभारणीकरिता २५ दिवसांचे (२१० तास) विनामूल्य कौशल्य विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याचे विषय विशेषज्ञ नारायण निबे व डॉ. चंद्रशेखर गवळी यांनी सांगितले. ग्रामीण भागातील तरुणांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक व्यवसाय उभारणी करण्याची सुवर्ण संधी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रशिक्षण वर्गासाठी प्रत्येकी २० जागा असून प्रशिक्षण वर्ग दि. ०६/०३/२०२३ ते ३१/०३/२०२३ या कालावधीत कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशिक्षण दरम्यान राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सदर प्रशिक्षणासाठी तरुण शेतकऱ्यांनी नारायण निबे मो. क्र.८८०५९८५२०५, डॉ. चंद्रशेखर गवळी मो. क्र. ७०८७८२८७५६ / ९४२१९५३०९६ व दत्तात्रय वंजारी मो. क्र. ९८२२५५१२११ या नंबरवर तात्काळ संपर्क करून आपला प्रवेश लवकर निश्चित करावा. प्रशिक्षण पूर्ण झालेनंतर भारत सरकारचे वतीने प्रमाणपत्र देण्यात येईल त्याचा वापर शासकीय अनुदान व बँक कर्ज यासाठी करता येईल.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर निश्चित करण्यात येईल. अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांनी दिली. अधिक माहितीसाठी
कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने
ता.शेवगाव, जि.अहमदनगर.
कार्यालय संपर्क :- ०२४२९-२७२०२०,२७२०३०
ई. मेल – kvkdahigaon@gmail.com या ठिकाणी संपर्क करावा.