शेवगाव शहरातील नागरिकांचे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयावर रस्त्यासाठी उपोषण चालू...!
*प्रतिनिधी:हरिशदादा चक्रनारायण*
शेवगाव शहरातील रस्त्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव शहरातील नागरिकांचे गेल्या दोन दिवसापासून उपोषण चालू आहे मात्र प्रशासनाचे उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष!आज दि.२/३/२०२३रोजी दुपारी 2 वाजता उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसनराव चव्हाण सर उपोषणकर्ते यांना भेट देण्यासाठी गेले व उपोषणकर्ते यांच्या समस्या समजुन घेतल्या व संबंधीत अधिकारी यांचेकडे रस्त्याच्या संदर्भात विचारणा केली.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी, गदेवाडी, आखतवाडे, हसनापूर,तळणी ,वडूले बु या गावातील अनेक ग्रामस्थ आप आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात आलेले होते परंतु आमचे कोणीच अधिकारी, कर्मचारी काहीच ऐकून घेत नाही त्यामुळे आम्हाला न्याय द्या ही भावना सर्वांनी प्रा.किसनराव चव्हाण यांचेकडे व्यक्त केली असता सरांनी त्यांचे ऐकून घेतल्यानंतर त्यांना सर्वांना घेऊन नायब तहसीलदार (महसूल विभाग ) श्री गुरव साहेब यांच्या कडे गेले आणि ज्या विभागाशी ज्यांचा प्रश्न निगडित आहे त्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन,लोकांच्या कामामध्ये काय अडचणी आहेत ते सांगा ?
अडचणी नसतील तर तात्काळ मार्गी लावा ...नाहीतर माझ्याशी गाठ आहे ? असा नायब तहसिलदार समोर सज्जड दमच दिला ...!
तालुक्यातील एक तलाट्याने तर एकदम शुल्लक कामासाठी तीन हजार रु.घेतले हे पण एका शेतकऱ्यांने तहसीलदार यांना सांगितले आणि तहसीलदार यांना लगेच त्यांच्याच मोबाईल वरून त्या लाचखोर तलाट्याला फोनही करायला लावला ...!
शेवगाव तालुक्यातील जनता खुप परेशान आहे ...अधिकारी, कर्मचारी मनमानेल तसे वागताहेत ...!
मुजोर पणाने बोलतात,गरीब लोकांचं खूपच शोषण करतात आणि ते ही दिवसा ढवळ्या गलेलठ्ठ पगार असतानाही पैशाशिवाय कोणतेही काम करत नाहीत ...!
याला सर्वस्वी जबाबदार फक्त लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच आहेत असेही प्रा.किसनराव चव्हाण यांनी म्हंटले आहे.
आम्ही गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांसोबत आहोत ...! कालही होतो ...! आजही आहोत ...! आणि उद्याही असणार आहोत ...!
शेवगाव तालुक्यातील जणतेला वेठीस धरणाऱ्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांची गय केली जाणार नाही त्यांना संविधानीक मार्गाने धडा शिकवला जाईल याची नोंद सर्वच सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असा सज्जड इशाराच प्रा.किसनराव चव्हाण सरांनी दिला आहे.
शेवगाव तालुक्यातील जणता प्रा.किसनराव चव्हाण सरांवरती फारच खुश आहे व शेवगाव -पाथर्डीचे भावी आमदार म्हणुन त्यांच्याकडे फारच आशेने बघत आहेत.
*वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसनराव चव्हाण सरांनी शेवगाव तालुक्यातील जणतेसाठी आपला मोबाईल नंबर सार्वजनिक केला आहे.9850291936 व कोणाला काहीही समस्या असेल तर डायरेक्ट फोन करण्याचे आव्हानही केले आहे.*