मा. सरपंच नेवासा फाटा अशोक भाऊ उपळकर व मुन्ना भाऊ चक्रनारायण यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा


नेवासा फाटा . 
 माजी नेवासा फाटा मुकिंदपूरचे चे सरपंच अशोक भाऊ उपळकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसा प्रसंगी अनेक मान्यवरांनी त्यांना भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या वाढदिवसा प्रसंगी माजी मृदा व जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाख व त्यांचे चिरंजीव उदयन दादा गडाख यांनी अशोक भाऊ उपळकर यांना वाढदिवस कार्यक्रम प्रसंगी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
  तसेच वाढदिवसाच्या प्रसंगी शिवसेना तालुका उपप्रमुख मुन्ना भाऊ चक्रनारायण यांचा सुद्धा वाढदिवस साजरा करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.  या कार्यक्रमासाठी अशोक भाऊ उपळकर यांना मानणारे अनेक तरुण मित्र मंडळ व जेष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी डीजे वाद्यावरती अनेक तरुणांनी नृत्य करून आनंद व्यक्त केला 
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख निमंत्रक बिट्टू भाऊ लष्करे व नारायण भाऊ लष्करे यांचे स्वागत समस्त उपळकर परिवार व अहमदनगर पुणे औरंगाबाद मुंबई तसेच नेवासा फाटा घोडेगाव सोनई भेंडा वडाळा व महाराष्ट्र राज्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समस्त मान्यवरांनी अशोक भाऊ सह प्रमुख निमंत्रका सह सत्कार करून केला  वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.