जात न पाहता गुणवत्ता पाहून लोकप्रतिनिधी निवडला तरच सर्वसामान्याचे प्रश्न सुटतील प्रा. किसनराव चव्हाण.
अहमदनगर (प्रतिनिधी):-हरिश चक्रनारायण
आपल्या देशाने संसदीय लोकशाही स्वीकारलेली असून मतदान करून आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो ,लोकप्रतिनिधी हा गुणवत्ताधारक असेल तरच तो जनतेचे प्रश्न ताकतीने सोडवू शकतो पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये लोकप्रतिनिधी निवडून देतांना त्याची गुणवत्ता न पाहता " जातीसाठी माती खावी " या उक्तीप्रमाणे त्याची जात पाहून त्याला निवडून दिले जाते आणि नंतर तोच जनतेची माती करतो आणि जनतेला वाऱ्यावरती सोडून देऊन स्वतःच गब्बर होतो त्यामुळे यापुढे आपले लोकप्रतिनिधी निवडतांना त्यांची " जात " न पाहता उमेदवारांची गुणवत्ता पाहून मतदान करा तरच आपले प्रश्न सुटतील असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी पाथर्डी तालुक्यातील कासारवाडी येथे झालेल्या घोंगडी बैठकीत ते ग्रामस्थांबरोबर बोलतांना काढले.
*तालुक्यातील कासारवाडी येथे ग्रामस्थांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी घोंगडी बैठक घेतली बैठकीचे अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोसले हे होते प्रथम गावातील युवकांनी प्रा चव्हाण यांचे ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणुक काढली , या बैठकिस महिला भगीणी व युवकांची संख्या लक्षणीय होती यावेळी प्रा किसन चव्हाण यांचे महीला भगीणींनी औक्षण केले या प्रसंगी शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई बोलतांना म्हणाले की प्रा किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीने वाडी वस्ती, गावां गावात, पाथर्डी, शेवगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचा स्वाभिमान जागृत झाला आहे. सध्या शेवगाव पाथर्डी मतदार संघामध्ये प्रा किसन चव्हाण यांच्या घोंगडी बैठकीने नवचैतन्य निर्माण झाले आहे पाथर्डी तालुका महासचिव सजंय कांबळे,महीला तालुका अध्यक्ष सुनिता जाधव,नंदुभाऊ कांबळे,अमोल जाधव यांचीही भाषणे झाली ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना आपल्या धारदार भाषणात प्रा किसन चव्हाण यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील प्रस्थापित कारखानदार ,सत्ताधारी व विरोधकांचा खपसुन समाचार घेतला या प्रसंगी प्रा किसन चव्हाण म्हणाले की मी गावोगाव जातोय घोंगडी बैठकीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवतोय त्यामुळे पुढील निवडणुकीत पाथर्डी, शेवगाव मतदारसंघात पैसा व जात याला सर्वसामान्य जनताच मूठमाती देणार असल्याचा विश्वास प्रा चव्हाण यांनी व्यक्त केला.घोंगडी बैठकीसाठी जवखेडे चे उपसरपंच मेजर नितीन जाधव ,मिरीचे माजी सरपंच काळू मिरपगार, पप्पू जाधव,अशोक बिडे, आसाराम भोसले,अनिल भोसले,शिवाजी भोसले,अशोक भोसले,लक्ष्मण भोसले,संतोष पाचर्णे,सचिन कासोटे, भास्कर भोसले,भगवान भोसले,सतीश भोसले,ज्ञानेश्वर भोसले, सुजित भोसले आदी कार्यकर्ते युवक महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन बाळासाहेब भोसले यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर भोसले यांनी मानलेे.