आम आदमी पार्टी नेवासा चे वतीने चिपको आंदोलन
नेवासा
सध्या नेवासा ते श्रीरामपुर या रस्त्याचे काम चालू आहे. नेवासा हद्दीमध्ये कॉन्ट्रॅक्टर ची रस्त्याच्या कामाकरिता नेमणूक केलेली आहे. नेवासा ते पाचेगाव या परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला मोठमोठाली चिंचेची तसेच इतर झाडे सुमारे ५० ते ६० वर्षापासून आहे. सदरचा रस्ता हा रुंदी करण करण्याच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरने व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी वन विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करुन बेकायदेशिर रित्या रस्त्याच्या कडेला असणारी चिंचेची तसेच इतर झाडांची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नसतांनाही अथवा रस्ता रुंदीकरणाला कुठलीही अडचण नसतांनाही साईड पट्ट्याच्या पलीकडचे झाडे तोडीत आहेत. तसेच वर्षानुवर्षे उभी असणारी झाडांची कत्तल करीत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा -हास होणार आहे. सदरची परिस्थिती पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. तसेच रस्त्याची शोभा कमी होणार आहे. त्याचप्रमाणे सदरची झाडे तोडून त्याची लाकडे कुठे विकली जात आहेत ? याबाबत देखिल चौकशी अंती स्पष्टीकरण देण्यास कोणीही तयार नाही. सदर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करुन झाडांची कत्तल थांबविणे गरजेचे आहे. अन्यथा रस्त्याची कडेची संपूर्ण झाडे तोडली जाणार आहे. तसेच सदर प्रकरणात पक्षाच्या वतीने हरित लवादाकडे देखिल तक्रार करण्यात येणार आहे.सदर प्रकरणात तातडीने हस्तक्षेप घेणे झाडांची कत्तल न थांबवल्यास आम आदमी पार्टी नेवासा च्या वतीने कुठलीही पूर्व सुचना न देता झाडांना चिपको आंदोलन करण्यात येणार आहे. असे निवेदन तहसीलदार यांना दिले असे निवेदन पक्षाचे नेते ॲड.सादीक शिलेदार,राजु आघाव,देवराम सरोदे,प्रवीण तिरोडकर,भाऊसाहेब बेल्हेकर, अण्णा लोंढे, याच्या सह्या आहेत