नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथील भांगे ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीच्या संचालकावर नेवासा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल.

नेवासा
 नेवासा तालुक्यातील खडका फाटा येथे असलेल्या ऑरगॅनिक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर नेवासा पोलीस स्टेशन येथे. अफसर रतन शेख 
मच्छिद्रनाथ ओहरसिज प्रा. लिमिटेड आष्टी जि. बीड या ठिकाणी मॅनेजर म्हणून कामकाज करत असलेल्या शेख यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे यामध्ये त्यांनी नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे  त्यात त्यांनी असे सांगितले आहे की   खडकाफाटा 
 येथील संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे यांच्या भांगे ऑग्रोनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीशी संयुक्त करार केलेला असून त्या करारानुसार आमच्या
कंपनीने भांगे आग्रोनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीस कच्चा माल पुरवून त्यांनी तयार केलेल पक्का
माल (इथॉईल असिटेट) परत आम्हाला दयायचा सदर पक्क्या मालाच्या खरेदी विक्रीत जो नफा होईल
त्यात 60टक्के हिस्सा आमच्या कंपनीचा व 40 टक्के हिस्सा हा भांगे कंपनीचा असलेबाबत सन 2021
च्या जुलै महिन्यात झालेल्या संयुक्त करारात नमूद केलेले आहे. करारानुसार 11 लाख रुपये
सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून व 28 लाख रुपये बॉयलरच्या कामाकरिता आमच्या कंपनीने भांगे
ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेडला दिले होते परंतु भांगे कंपनीने बॉयलरच्या कामाकरिता न वापरता
संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे यांनी त्यांचे वैयक्तिक कामाकरिता वापरले आहे.
सन 2021 सप्टेंबर मध्ये भांगे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीचे प्रॉडक्शनचे काम सुरु
झाले. त्यानंतर आमच्या कंपनीने संजय भाऊसाहेब भांगे  यांनी सांगितलेल्या कंपनीकडुनच आम्ही कच्चा माल विकत घेतला. परंतु काही दिवसानंतर आमच्या कंपनीच्या असे लक्षात आले की, संजय भांगे हा आम्हाला ज्या कंपनीकडून कच्चा माल खरेदी करायला लावतो ती कंपनी आम्हाला मार्केटपेक्षा जास्त दरात कच्चा माल विकत देत आहे. आमची कंपनी ज्याच्याकडून कच्चा माल विकत घेते ती कंपनी आम्हाला जास्त दरात माल देत आहे याची जाणीव संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे यांना माहीती असून देखील त्यांनी आम्हाला त्यांच्या मर्जीनुसार कच्चा माल विकत घेण्यास सांगत असे त्यामुळे सप्टेंबर
2021 ते ऑक्टोबर 2021 मध्ये आमच्या मच्छिद्रनाथ ओहरसिज प्रा. लिमिटेड कंपनी आष्टी जि. बीड
या कंपनीस 2 कोटी 93 लाख रुपयाचे नुकसान झाल्याने त्याबाबत आमच्या कंपनीच्या संचालक
• मंडळाने झालेल्या नुकसानीबाबत त्यांच्या लक्षात आणून दिल्याने त्याने जाणूनबुजून आमच्या कंपनीची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कौटुंबिक वाद पुढे करत सुमारे 03 महिने प्लॉण्ट (उत्पादन) बंद ठेवला.सन 2021 मध्ये आमच्या कंपनीशी झालेल्या संयुक्त करारातील अट क्र. 8 नुसार भांगे ऑग्रॉनिक
केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीची (इथॉईल असिटेट) उत्पादन क्षमता 50 टन प्रतिदिन चालेल तसेच
सदरचा प्लांट हा वार्षिक 330 दिवस चालेल असे नमूद आहे परंतु वास्तविक भांगे याचा प्लॉट प्रतिदिन
20 ते 25 टनाच्या पुढे चालत नव्हता व वार्षिक 330 दिवस चालत नसून तो कोणत्या ना कोणत्या
कारणावरुन प्लांट बंद ठेवून आमचे कंपनीचे आर्थिक नुकसान करुन करारात नमुद अटी व शर्तीनुसार
न वागल्याने आमच्या कंपनीची फसवणूक होत असलेबाबत आमच्या संचालक मंडळाच्या लक्षात
आले. सन 2022 च्या जुलै महिन्यात भांगे ऑयॉनिक केमोकल प्रा. लिमीटेड कंपनीचे मेन्टेनेसचे काम
निघाल्याने जुलै 2022 ते सप्टेंबर 2022 अशी सुमारे 2 महिने उत्पादन बंद होते परंतु करारातील अट
क्र. 8.4 नुसार जो काही ब्रेकडाऊन असेल तो 07 दिवसांच्या वर असेल तर होणारे नुकसान हे भांगे
औद्योगिक केमीकल प्रा लिमीटेड कंपनी ही मच्छिंद्रनाथ ओवरसिज प्रा. लिमिटेड आष्टी जि.बीड हिस
व्याजासहित नुकसानभरपाई देण्याचे करारात नमुद आहे परंतु भांगे यांनी आमच्या कंपनीला जुलै
2022 ते सप्टेंबर 2022 अशा दोन महिन्यांची नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करून आमच्या
कंपनीची फसवणूक केलेली आहे.
सन सप्टेंबर 2021 ते फेब्रुवारी 2023 या काळात भांगे औग्रोनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनी
खडका फाटा तो नेवासा यांचे संचालक संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे दोन्ही रा.
खडकाफाटा ता. नेवासा हरा अहमदनगर यांनी आमच्या मच्छिंद्रनाथ ओवरसिज प्रा. लिमिटेड आष्टी
जि.बीड सोबत केलेल्या संयुक्त कराराच्या अटी व शर्तीनुसार न वागता आमच्या कंपनीची फसवणूक
करण्याचा उद्देशाने आमच्या कंपनीकडून खालील प्रमाणे वेळोवेळी रोख रक्कम घेतली आहे. ती
1) 1.61,05,408 /- रुपये एमएसईबीचे वीजबील भरणा, त्यांचे कर्जाचा इएमआय भरणा करिता व
अॅडव्हान्स कॅश
2) 35.81,628 /- रुपये भांगे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीच्या कर्मचा-यांच्या पगाराकरिता
3)49,91,040 /- रुपये भांगे ऑगॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीचे वीजभरणा करिता
4) 44.63 648/- रुपये भांगे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीतील मशीनरी विकत घेण्याकरिता
5) 1.35,29, 235/- रुपये मच्छिद्रनाथ ओवरसिज प्रा. लिमिटेड आष्टी जि.बीड ची जीएसटी रक्कम
भागे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीच्या खात्यात जाणूनबुजून अडकवून ठेवली आहे.
6) 23.01744 /- रुपये भांगे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनीच्या मेन्टेनेस पोटी मच्छिद्रनाथ
ओवरसिज प्रा. लिमिटेड कंपनीकडून घेतलेली रोख रक्कम
7) 48,7500/- रुपये भागे ऑग्रॉनिक कमोकल प्रा. लिमीटेड कंपनीच्या पाण्याच्या पाईपलाईन करिता
मच्छिद्रनाथ ओहरसिज प्रा. लिमिटेड घेतलेली रोख रक्कम
8) 75.64.242/- रु बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या खेळत्या भांडवलावरचा व्याजाचा भूदंड
= 5,30,24,525 रुपये एकुण
वरील प्रमाणे यातील भांगे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमोटेड कंपनी खडका फाटा ता. नेवासा
यांचे संचालक संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे दोन्ही रा. खडकाफाटा, ता. नेवासा ह. रा.
अहमदनगर यांनी आमच्या मच्छिद्रनाथः ओहरसिज प्रा. लिमिटेड आष्टी जि.बोड कंपनीचा विश्वास
संपादन करून कंपनीकडून वेगवेगळ्या कामाकरिता रोख रक्कम घेवून केलेल्या संयुक्त कराराच्या
अटी व शर्तीनुसार न वागता त्यांची कंपनीचे उत्पादन कोणत्या न कोणत्या कारणावरून सतत बंद
ठेवून आमच्या मच्छिद्रनाथ ओहरसिज प्रा. लिमिटेड आष्टी जि.बीड कंपनीची सन सप्टेंबर 2021 ते
फेब्रुवारी 2023 या काळात 4,54,60283 रुपयेची फसवणूक केली आहे. तसेच आमच्या कंपनीचे
घेतलेल्या कर्जाच्या खेळल्या भांडवलावरचा व्याजाचा भुदंड म्हणून 75,64,242/- रुपये नुकसान केलेले
आहे  त्यानुसार भांगे ऑग्रॉनिक केमीकल प्रा. लिमीटेड कंपनी खडका फाटा ता नेवासा यांचे
संचालक संजय भाऊसाहेब भांगे व स्मिता संजय भांगे  यांचे विरुध्द तक्रार आहे.गु.र.नं. ३१८/२०२३ भादवी कलम ४२० प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील तपास तपासी अंमलदार पोसई एस.जी. ससाणे हे करीत आहे
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.