नेवासा
अहमदनगर जिल्हा शासकीय, निमशासकीय कर्मचारी व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक समन्वय समिती शाखा नेवासा यांच्यावतीने जुनी पेन्शन विना अट लागू करावी, या मुख्य व इतर प्रलंबित मागणीसाठी नेवासा पंचायत समितीच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच तहसील कार्यालय नेवासा येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी समन्वय समितीच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.राज्यातील २००५ नंतरचे सर्व कर्मचारी यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत चालू ठेवण्यासाठी पंचायत समिती व तहसील कार्यालय नेवासा येथे ठिय्या आंदोलन करत कर्मचाऱ्यांनी राज्य सरकार विरोधात रोष व्यक्त केला.