*वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच मागण्या मान्य केल्याने होणारे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.*


*वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच मागण्या मान्य केल्याने होणारे रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.*
प्रतिनिधी:-(अहमदनगर)
मा.हरिशदादा चक्रनारायण 
वंचित बहुजन आघाडी पाथर्डी तालुका आणि कोरडगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
 वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसान चव्हाण सर, पाथर्डी तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरभाऊ म्हस्के, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांची निवेदन देण्यात आले होते. 
आज माननीय तहसीलदार श्याम वाडकर साहेब यांनी आंदोलन कर्त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीसाठी नायब तहसीलदार गुंजाळ साहेब, महावितरण चे माळी साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शिरसाट साहेब,तहसीलच्या एम बारे मॅडम, तहसील चे घरकुल विभागाचे ऋषिकेश पालवे साहेब इत्यादी अधिकारी हजर होते.
 या बैठकीसाठी वंचित जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ सोनटक्के, शहराध्यक्ष इरफान शेख, सर्जेराव सानप गुरुजी, तुपेरे मेजर, मा ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मुखेकर, संतोष कुसळकर हजर होते. यावेळी तुपेरे वस्तीचा प्रलंबित असलेला सिंगल फेज चा विषय तातडीने मार्गी लावू तसेच कोरडगाव गावातील विजेचे मोडकळीस आलेले पोल, तसेच लोम कळलेल्या तारा सर्वे करून दुरुस्त करू असे आश्वासन महावितरणचे माळी साहेब यांनी दिले. कोरडगाव ते पाथर्डी निपाणी जळगाव चांदगाव मार्गे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातून छत्रपती हायस्कूल ते खंडोबा नगर वगळण्यात आलेल्या बाराशे मीटरच्या रस्त्याचे काम तातडीने चालू करू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शिरसाट साहेब यांनी दिले. कोरडगाव ते सुसरे हा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच काम तातडीने सुरू करावे या मागणीसाठी स्वतः तहसीलदार साहेब यांनी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. घरकुलाचे थकलेले हप्ते लवकरात लवकर बँक खात्यावर जमा करून पैसे अदा करू असे आश्वासन ऋषिकेश पालवे साहेब यांनी दिले. अन्नधान्यापासून वंचित असणाऱ्या कुटुंबाना लवकरच या योजनेत नावे समाविष्ट करून घेऊ असेही आश्वासन माननीय तहसीलदार साहेब यांनी दिले. संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित असलेले लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. कोरडगाव ला लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच तात्पुरत्या स्वरूपात कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात येईल असे आश्वासन आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आले. माननीय तलाठी साहेब यांची तातडीने बदली करण्यात येईल आणि नवीन तलाठ्याची नेमणूक करण्यात येईल अशी मागणी यावेळेस मान्य करण्यात आली. आंदोलन कर्त्यांच्या जवळपास सगळ्याच मागण्या व अटी मान्य करण्यात आल्यामुळे उद्या आयोजित रास्ता रोको आंदोलन यावेळी मागे घेण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.