मराठा सेवा सं नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहाव्या शाखेचा शुभारंभ शनिवारी दि. 11/02/2023 रोजी दुपारी 12.00. वा. शेवगाव येथे होणार आहे.
नेवासा - अमोल मांडण
शेवगाव
सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचा हात देणाऱ्या आणि सभासदांचा विश्वास संपादन केलेल्या मराठा सेवा संघ प्रणित मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहाव्या शाखेचा शनिवारी दि. 11/02/2023 रोजी दुपारी 12.00. वा. न्यू आर्ट , कॉमर्स , सायन्स कॉलेज चे माजी प्राचार्य मा.शिवश्री प्रा.शिवाजीराव देवढे आणि मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मा.शिवश्री इंजिनिअर सुरेशराव इथापे यांच्या शुभहस्ते होत आहे.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.शिवश्री इंजिनिअर विजयकुमार ठुबे असणार आहेत.
ढमाल कॉम्प्लेक्स, मिरी रोड शेवगाव येथे होत असल्याने या 6 व्या शाखेच्या शुभारंभास शेवगाव, पाथर्डी आदींसह जिह्यातील सहकारी, शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, पत्रकार आदीं क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.तरी या शुभारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन सतीश इंगळे, किशोर मरकड,पोपटराव काळे, ज्ञानदेव पांडुळे, राजश्री शितोळे, काशिनाथ डोंगरे, निर्मला गिरवले, शोभाताई जाधव,ज्ञानेश्वर अनभुले, सी.ए.विश्वास कारंजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड सह व्यवस्थापक बबनराव सुपेकर,शाखा व्यवस्थापक महेशकुमार नलवडे यांच्यासह आदींनी केल.