नेवासा-अमोल मांडण
नेवासा- नेवासेनगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रेच्या निमित्ताने नेवासा प्रेस क्लबच्या वतीने झेंडा मिरवणूक काढण्यात आली.
नेवासा.
नेवासा नगरीचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री मोहिनीराजांची यात्रा उत्सवाच्या निमित्ताने नेवासा प्रेस क्लब च्या वतीने झेंडा काढण्यात आला यावेळी मिरवणूकीत शहरातील प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते
जेष्ठ पत्रकार बांधवांच्या हस्ते झेंडा पूजन करण्यात आले
नेवासा बस स्थानक ते मोहिनींराज मंदिर पर्यत वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत श्री मोहिनीराजाच्या नावाचा जयघोष करत पायी जाऊन मंदिरावर झेंडा चढविला यावेळी श्री मोहिनींराज मंदिराचे पुजारी भालचंद्र बडवे व यात्रा उत्सव कमिटीचे वतीने राजेंद्र मापारी यांनी प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांना श्रीफळ देऊन सर्व पत्रकारांचा सन्मान केला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड , जेष्ठ पत्रकार सुधीर चव्हाण, अशोक डहाळे, कैलास शिंदे, शाम मापारी, नानासाहेब पवार, रमेश शिंदे, पवन गरुड मकरंद देशपांडे, सुहास पठाडे, अभिषेक गाडेकर यांच्या सह पोलीस हवालदार तुळशीराम गीते, पोलीस नाईक सुहास गायकवाड
विश्वास रानवडे,अमोल रणमले,शिवरुद्र शेटे आदि उपस्थित होते.