प्रतिनिधी -अमोल मांडण
नेवासा- तालुक्यातील मक्तापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा सुकाणु समितीच्या वतीने मराठी राज्य अभिषेक दिन साजरा करण्यात आला.
नेवासा तालुक्यातील मुक्तापूर येथे मराठा सुकाणु समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करण्यात आला. यावेळी मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे मानले की आपला इतिहास, आपली भाषा यांचा गौरव करणे,त्याची अस्मिता आणि अभिमान बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. मराठी दिनाचा महाराष्ट्रातील मराठी समाजाचा हा खास दिवस मानला जातो. आपल्याला मराठी असल्याचा अभिमान आहे असे झगरे म्हणले. यावेळी मराठा सुकाणु समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे, भाऊसाहेब कांगुणे, लहानु बर्डे, काळू साळवे, नीलू कांगुणे, योगेश गायकवाड, रविभाऊ खैरे, अमोल खैरे, संभाजी बर्डे, योगेश कांगुणे, दीपक बर्डे, अक्षय भागवत आदि मक्तापूर ग्रामस्थ उपस्थित होते.