प्रतिनिधी - अमोल मांडण
नेवासा- मुळाचे आवर्तन नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनसाठी सोडा- प्रहार जनशक्ती पक्ष.
नेवासा तालुक्यात संपूर्ण शेती मुळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून असून निसर्गाच्या कृपेने धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. ही सर्व परिस्थिती असताना नेवासा तालुक्यातील टेलच्या भागातील डी वाय पाच परिसरातील शेतकरी हे भौगोलिक दृष्ट्या उंचावर येतात येथील शेत जमिनीचे पाणी उन्हाळ्यामध्ये कमी पडते त्याचबरोबर टेल चा भाग असल्याने पाणीदेखील पोहोचण्यासाठी वेळ लागतो या सर्व परिस्थितीचा विचार करता या परिसरातील शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केलेली आहे. मागील आवर्तनाच्या वेळेस गहू उभी होती परंतु या भागातील जमिनीचे स्वरूप मुरमाड असल्याने येथील जमिनीला उन्हाळ्यामध्ये आठ दिवसाला पाणी द्यावे लागते त्यामुळे आणि मागील आवर्तनाच्या वेळेस जास्तीत जास्त तीन ते चार दिवस आवर्तन चालल्याने भूगर्भातील पातळी देखील वाढलेली नाही यामुळे शेतकऱ्याच्या सध्याची स्थिती ही कांदा पिकासाठी अंतिम टप्प्यातील आहे त्याचबरोबर धरण भरलेले असताना नेवासा भागात पाणी सोडावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सल्लागार ॲड.पांडुरंग औताडे, तालुका कार्याध्यक्ष अनिल लक्ष्मण विधाटे, पाणी वापर संस्थेचे संपत नवले, संतोष कडू सर, बाळासाहेब विधाटे, उमाजी विधाटे, दत्ता विधाटे, शालिग्राम विधाटे, पांडुरंग नवले सतीश विधाटे, मारुती विधाटे, महेश विधाटे, प्रदीप विधाटे, आदिनाथ नवले, शिवराज कडू आनंद कडू, गंगाराम निकम, राजेंद्र कळसकर नवनाथ औताडे, सचिन कडू, व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन कार्यकारी अभियंता अहमदनगर यांना देण्यात आलेले आहे. यावेळी अहमदनगर येथील कार्यालयाकडून आश्वासन देण्यात आले की शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याची मागणी करावी त्याप्रमाणे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देण्यात येईल.