नेवासा- प्रतिनिधी अमोल मांडण
नेवासा- नेवासा शहरातील धार्मिक स्थळाजवळ पाच जणांना गांजा ओढताना नेवासा पोलिसांनी पकडले.
नेवासा शहरातील अमरी पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे काम नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून मंगळवारी 31 जानेवारी रोजी नेवासा येथील गोकर्णेश्वर मंदिराच्या जवळ पाच जणांना गांजा उडताना नेवासा पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करून त्यांना अटक केली आहे नेवासा पोलिसांच्या कारवाईचे भाविकांनी व नागरिकांनी कारवाईचे कौतुक आहे.
नेवासा शहरात सध्या आमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कारवाई करण्याची मोहीम नेवासा पोलीस कडून सुरू आहे.प्रवरा नदीच्या तीरावर पुरातन जागृत देवस्थान गोकर्णेश्वर मंदिराजवळ काही ईसम गांजा ओढत असून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास होत असल्याची माहिती नेवासा पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीप ढाकणे, पो.हे.को. तुळशीराम गीते, पो. काॅ. बाळासाहेब खेडकर हे कारवाईसाठी रवाना झाले. गोकर्णेश्वर मंदिराच्या आडोशाला बसलेले काही इसम गांजा ओढताना दिसून आल्याने पोलीसांची व पंचाची खात्री झाल्याने सर्वांनी नमूद इमांना रात्री १२.३०. वा.च्या सुमारास जागीच पकडून ताब्यात घेतले. त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी गणेश वसंत पालवे रा.कडु गल्ली, मोहन गीताराम जायगुडे रा. नेवासा बुद्रुक, जब्बार सिकंदर पिंजारी रा.लक्ष्मीनगर, गणेश दिलीप बोर्गे रा.पाक शाळेजवळ नेवासा, शंतनु अनिल देशमुख रा. नेवासा खुर्द असे असल्याचे सांगितले. या इसमांना पुढील कारवाई करिता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले.सदर इसमाची ग्रामीण रुग्णालयात नेवासा फाटा येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. डॉक्टरनीं सदर इसम गांज्याचे सेवन केलेले असल्याचे याबाबत प्रमाणपत्र दिले. त्यावरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली
पो.हे.कॉ.तुळशीराम गीते हे करत आहे.