नेवासा प्रतिनिधी- अमोल मांडण
नेवासा- डायल 112 वर कॉल करून मी खून केला आहे अशी खोटी माहिती तरूणाने पोलिसांना दिली.
26 जानेवारी रोजी खुन झाल्याचा असाच एक चुकीचा कॉल 112 वर करून रामडोहच्या तरुणाला अटक केली असताचे प्रकरण ताजे असतानाच आता परत एकदा शिरसगाव येथील तरुणाने 112 वर कॉल केला आणि सांगितले की मी खून केला आहे. त्यामुळे नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी गस्तीसाठी रवाना झालेल्या पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवून पोलीस यंत्रणेची दिशाभूल केल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. शिरसगाव ता.नेवासा येथील दत्तू लांडे हा इसम जे.सी.बी. यंत्राच्या साहाय्याने माती उकरून रस्त्याच्या कडेला व त्याच्या शेत बांधावर खांब लावत असून अतिक्रमण करत आहे अशी माहिती देणाऱ्या अमोल लंघेनी पोलिसांना दिल्यावर पोलीस तत्काळ येणार नाही म्हणूनच मी खून केला आहे अशी खोटी माहिती 112 वर कॉल करून पोलिसांना चुकीची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली पोलीस घटनास्थळी आल्यावर कोणताही अनुचित घटना घडलेली नसल्यामुळे पोलिसांचा चांगलाच पारा चढला व खाकीचा इस्का दाखवताच खोटी माहिती देऊन पोलिसांना दिशाभुल करणाऱ्या अमोल लंघे या तरूणाचा चांगलाच समाचार घेतला व त्याला वाहनात टाकून नेवासा पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.