प्रतिनिधी
नेवासा - अमोल मांडण
नेवासा- बंदी असलेल्या मांगुर माशाची वाहतूक करताना दोघांना पकडण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नेवासा पोलिसांच्या मदतीने माळीचिंचोरे फाटा येथे सापळा लावून ही कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशाने पथकातील पो.हे.कॉ.संदीप पवार, पो.हे.कॉ.संदीप घोडके, पो.हेकॉ.मनोहर गोसावी, पो.हे.कॉ.दत्तात्रय गव्हाणे, पो.ना.ज्ञानेश्वर शिंदे, पो.ना.संदीप चव्हाण, पो.ना.संदीप दरंदले, पो.कॉ.कमलेश पाथरट, व नेवासा पोलीस ठाण्याचे पो.कॉ.योगेश आव्हाड हे खाजगी वाहनाने फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी गस्त घालित होते. यावेळी कटके यांना गुप्त बातमी मिळाली की एक टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या आयशर टेम्पो मधून बंदी असलेल्या मांगुर माशाची विक्री करण्यासाठी नगर- संभाजीनगर महामार्गावने जात आहे.या माहितीवरून पथकाने पंचासह माळीचिंचोरे फाटा येथे सापळा लावला. त्यानंतर माहिती मिळालेल्या टेम्पो तेथे आला पोलिसांनी तो थांबवला या टेम्पोमध्ये मांगुर जातीचे मासे असल्याचे दिसून आले. यावेळी सहाय्यक मच्छ विकास अधिकारी प्रतिभा दत्तू यांनी माशाची पाहणी केली. त्यांनीही हे मासे मांगुर जातीचे असल्याचे सांगितले. प्रतिभा दत्तू यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम 188 प्रमाणे आरोपी बप्पा ताजरूल बिश्वास (वय 32) रा.अर्शकारी.ता.स्वरूपनगर. पश्चिम बंगाल व तोकामल मियाराज बिश्वास (वय 48) रा.बिथारी.ता.स्वरूपनगर. पश्चिम बंगाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.