नेवासा - अमोल मांडण
नेवासा- शहरातील पहाटेचे भारनियमन बंद करा:-नगरसेविका सौ.सिमाताई राजेंद्र मापारी
नेवासा शहरात अलीकडच्या काळात रोज पहाटे 5:30 ते 7:30 ह्या वेळेत नियमितपणे भारनियमन केले जात आहे.ह्या भारनियमन मुळे पहाटे पाण्याचे नागरिकांचे हाल होत असून,ऐन पाण्याच्या वेळेस ही लाईट जाते व त्या मुळे पाण्याला दाब राहत नसून नागरिकांचे हाल होत आहे.तसेच सध्या 10 वी व 12 वी चे बोर्डची परीक्षा चालु होत असून विद्यार्थ्यांना ऐन पहाटे अभ्यासाच्या वेळेतच हे भारनियमन होत असून या मुळे विद्यार्थ्यांचे ही हाल होत आहे. तसेच पहाटे वृद्ध फिरायला जात असतात ह्या वेळेत लाईट गेल्याने रस्त्यावरील पथदिवे ही बंद असल्याने अपघाताचीही शक्यता आहे.तरी हे भारनियमन बंद करावे किंवा त्यात बदल करावा अश्या मागणीचे निवेदन महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता यांना नगरसेविका सौ.सिमाताई राजेंद्र मापारी यांनी दिले असून,हे भारनियमन मध्ये बदल नाही झाला तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महावितरण कार्यालयाने त्वरित हे भारनियमन वेळेत बदल करून नागरिकांचे हाल थांबवावे:- नगरसेविका सौ.सिमाताई राजेंद्र मापारी.