..ऑनलाइन लाच स्वीकारणारा तलाठी गजाआड
अहमदनगर .
शहरात ऑनलाईन लाच स्वीकारणारा तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. रामेश्वर भागवत मोरे (रा. बायजाबाई कॉलनी, सावेडी) असे आरोपी तलाठ्याचे नाव आहे.
खांडके (ता. नगर) येथे ४८ गुंठे जमीन तक्रारदाराने विकली होती. या जमिनीची नोंद शासकीय अभिलेखात फेरफार करून घ्यायची होती. यासाठी तलाठी मोरे याने पैशांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने अहमदनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या पथकाने सुरभी हॉस्पिटल चौकात सापळा रचत तलाठी मोरे याला ऑनलाइन लाच स्वीकारताच रंगेहात पकडले.