नेवासा : नेवासा तालुका सकल ख्रिस्ती बांधवांच्या वतीने गुरुवारी (दि. २)सकाळी तहसील कार्यालयावर
महामूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव,भगिनी, युवक सहभागी झाले होते.देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरू व चर्चवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ हा मार्चा काढण्यात आला. धर्मगुरूंवरील खोटे
गुन्हे मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सेवक, पालकांनी यावेळी शिस्तबद्ध मूक मोर्चा काढला
होता.ख्रिस्ती धर्मगुरूंवरील दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत. तसेच नुकसान
केलेल्या चर्चना भरपाई मिळावी, अशी एकमुखी मागणीही यावेळी ख्रिस्ती बांधवांनी मोर्चाप्रसंगी केली.
ख्रिस्त राजा चर्च, घोडेगावचे प्रमुख धर्मगुरू फादर सतीश कदम व नेवासा येथील कॅथोलिक आश्रम ज्ञानमाऊली
पंचायत समितीच्या प्रांगणातून हा मूक मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयाकडे आला. यावेळी
मोर्चेकरी ख्रिस्ती बांधवांनी निषेधाचे फलक हाती घेतले होते. धर्मगुरू सतीश कदम म्हणाले, भारतीय ख्रिश्चन
असल्याचा अभिमान आहे. चर्च व धर्मगुरूंवरील हल्ले त्वरित थांबवा,हल्लेखोरांचा त्वरित बंदोबस्त करा,
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी निवेदन स्वीकारून
आपल्या भावना शासनस्तरावर पाठविल्या जातील, असे आश्वासन यावेळी मोर्चेकऱ्यांना दिले.