नगर : नवनगापुरात रेणुका माता वडापाव सेंटर गाड्याजवळ १५ रुपयांची भजी प्लेट
२० रुपयांना लावल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन, अनुसूचित
जातीच्या तरुणास मारहाण के ली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने एमआयडीसी पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज नामंजूर
झाल्याने आरोपी अर्जदार संकेत विठ्ठल सोमवंशी (रा. गजानन कॉलनी, नवनागापूर)
याने औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अपिल दाखल केले. त्याचा जामीन अर्ज
द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती विभा कणकवडी व अभय वाघवसे यांनी
मंजूर केला. अर्जदारार्फ ॲड. सतीशचंद्र वि. सुद्रीक यांनी काम पाहिले.