नगर :
शहरात मंगळवारी (दि. २१) रात्री. हातात तलवारी, लाकडी दांडके घेऊन सात जणांच्या टोळक्याने दहशत
निर्माण करत जुना बाजाराजवळील एका कुटुंबातील चार-पाच जणांना मारहाण केली. जीवे मारण्याचा प्रयत्न
केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिसांनी एका आरोपीला
अटक केली असून, इतर आरोपी फरार झाले आहेत.
याबाबत महंमद अरबाज जावेद खान (रा. जुना बाजार, बॉम्बे बेकरीजवळ) यांनी कोतवाली पोलिस
ठाण्यात फिर्याद दिली आहे. महंमद खान हे व्यावसायिक असून, ते मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या
सुमारास बांबू गल्लीतून जात होते.त्यावेळी सलमान गफ्फार सय्यद,अरबाज रशिद सय्यद या दोघांनी हाक हल्लेखोर मारली व म्हटले की, तू या पुढे फोनवर बोलू शकणार नाहीस, असे म्हणत त्याचा मित्र समीर सय्यद,
इरफान बेग, शाहरुख रशिद सय्यद,फिरोज सय्यद, इम्रान बेग यांना बोलावून घेतले व मारहाण करण्यास
सुरूवात केली. आरडाओरडा केला असता महंमद यांचे वडील जावेंद जमाल खान, चुलत भाऊ फरदिन
शहानवाज खान, शहनवाज जमाल खान, अय्याज मुश्ताक खान हे तेथे आले व त्यांनी भांडण मिटविण्याचा
प्रयत्न केला.मात्र, आरोपींनी हातात तलवारी व लाकडी दांडके असल्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.