विनापरवाना मोर्चा, २०० जणांवर गुन्हे कट मारल्याच्या कारणातून दोन गटात मारामारी .

विनापरवाना मोर्चा, २०० जणांवर गुन्हे

नगर : क्राईम अपडेट

 श्रीगोंदा येथे दुचाकीला कट मारल्याच्या कारणातून दोन गटात झालेल्या मारामारीनंतर पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही श्रीगोंदा शहर बंद ठेवत निषेध मोर्चा काढणाऱ्या आयोजकासह २०० जणांवर श्रीगोंदा पोलिसांनी विनापरवानगी जमाव जमा करणे, मोर्चा काढणे, प्रक्षोभक भाषणे करणे यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. श्रीगोंदा शहरातील विद्यालयाजवळ दुचाकीच्या कारणातून दोन गटात हाणामारी होऊन दोन जणांना पोलीस ठाण्याच्या आवारात बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीच्या विरोधात श्रीगोंदा शहर बंद करत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 
 सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाने शहर बंद व निषेध मोर्चास परवानगी नाकारली होती. तसेच आंदोलनकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या असतानाही श्रीगोंदा शहर बंद ठेवत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात निषेध सभा घेण्यात आली. 
 याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी आंदोलन आयोजकासह इतर २०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.