सन २०२४ मध्ये मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार
.............!.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह.
अहमदाबाद.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विक्रमी बहुमताने बाजी मारली असून, हा निकाल राज्यासाठी नव्हे, तर देशासाठी महत्त्वाचाआहे. आगामी सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला असेच घवघवीत यश मिळेल व नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा
पंतप्रधानपदी आरूढ होतील, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केला. गुजरातमध्ये पोकळ आश्वासने देणारे विरोधी पक्षांचे नेते तोंडघशी
पडल्याची टीका त्यांनी केली.गुजरातच्या अहमदाबाद शहरात विविध योजनांची पायाभरणी व उद्घाटन
अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, गुजरातच्याजनतेने विधानसभा निवडणुकीत १८२
पैकी १५६ जागांवर भाजपला विजयी कौल देत जातीयवादाचे विष नष्ट केले.अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीवअसलेल्या ४० पैकी ३४ जागा भाजपने खिशात घातल्या. पोकळ, खोटे व प्रलोभन
दाखवणाऱ्यांना सणसणीत चपराक देण्यात आली. गुजरात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाहक बदनामी करणाऱ्यांनाही जनतेने मतपेटीतून प्रत्युत्तर दिले. गुजरात
विधानसभा निवडणुकीच्या निकालातून
२०२४ च्या निवडणुकीसाठी देशभरात महत्त्वाचा संदेश दिला गेला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी (उत्तर ते दक्षिण) आणि द्वारका ते कामाख्यापर्यंत (पश्चिम ते
पूर्व) मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार असल्याचेही स्पष्ट झाल्याचा दावा अमित शाह यांनी केला. स्टॅच्यू ऑफ युनिटीआणि अहमदाबादेत जगातील सर्वात मोठे क्रीडा मैदान भाजपने बनवल्याचेही त्यांनी सांगितले.