नेवाशात बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिरास मोठा प्रतिसाद
नेवासा. प्रतिनिधी अमोल मंडन
आज समर्पण फाउंडेशन च्या पुढाकाराने नेवासा शहरातील बांधकाम कामगार यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. आपल्या शहरातील कामगार व मजुरांसाठी ज्या काही आरोग्य विषयी समस्या होत्या या समस्यांचे निरसन व्हावे. व त्यांच्या शरीराची तपासणी व्हावी या सकारात्मक धोरणांमुळे कामगारांचे व मजुरांचे आरोग्य कसे उत्तम राहील यावर भर देण्यासाठी या आरोग्यदायी शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी नेवासा मधून प्रमुख मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये माजी नगरउपाध्यक्ष श्री नंदकुमार पाटील, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ करणसिंह घुले, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष श्री विवेक नन्नवरे, शहराध्यक्ष श्रीकृष्ण डहाळे, इंजिनीयर श्री सोलट साहेब, इंजिनीयर श्री खंडागळे साहेब, डॉ भारत करडक, श्री जानकीराम डौलै व इतर मान्यवर उपस्थित होते या शिबिराचा सर्व कामगारांनी लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.