नेवासा नगरपंचायत करते दुर्लक्ष धरणे आंदोलनाचा इशारा.

नेवासा :  नेवासा शहरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे येणारे रस्त्यातील व निर्माण होणारे अडथळे दूर करा,रस्ते कायमस्वरूपी मोकळे करा या मागणीकडे नेवासानगरपंचायत दुर्लक्ष करीत आहे.त्याच्या निषेधार्थ १७ जानेवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन व चक्री उपोषण करण्याचा इशारा संत ज्ञानेश्वर महाराजमंदिर संस्थानचे मुख्य मार्गदर्शक शिवाजी महाराज देशमुख यांनी दिलाआहे.मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्यानिवेदनात म्हटले आहे की, नेवासा शहरातून संत ज्ञानेश्वर महाराज
मंदिराकडे येणारे मुख्य रस्ते वाहातुकीसाठी कायमस्वरुपी मोकळेकरावेत, याबाबत निवेदन दिले होते.परंतु, आजपर्यंत मागणीवर नगरपंचायतीने कोणतीही कारवाई केली नगरपंचायतीच्या
नाही.याअकार्यक्षमतेचा आम्ही निषेध करीत
आहोत.नगरपंचायतीच्या चालढकलीच्या निषेधार्थ संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान भक्त मंडळ,
ग्रामस्थ, वारकरी व समर्पण फाउंडेशनसह १७ जानेवारीपासून नगरपंचायतीच्या मुख्य चौकात बेमुदत
धरणे आंदोलन व चक्री उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यातआलेला आहे.दरम्यान, नेवासा या संतनगरीला मोठे ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले
आहे. येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असतात. त्यामुळे
प्रामुख्याने येथील रस्ते चांगली असणे गरजेचे आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपली वाहने घेऊन येथे दर्शनासाठी येतात.मात्र, श्री खोलेश्वर मंदिरापासून ते
नगरपंचायत चौक ते ज्ञानेश्वर मंदिर रस्ता या मार्गावर मध्येच दुकाने लावल्याने अडथळे निर्माण होत
आहे. त्यामुळे वाहन चालक, तसेच भाविकांची मोठी गैरसोय होते. ही समस्या भेडसावत असल्याने वारकरी व नागरिकही रस्त्यावरउतरणार आहेत. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.